Mhada Lottery 2024 :  मराठी नाटक आणि टीव्ही मालिकांमध्ये लेखक हे महत्त्वाची भूमिका बजावतात. लिहिण्याची एक कला असते म्हणून त्यांनाही कलाकार म्हणतात.. मात्र हे लेखक आता कलाकार आहेत की  नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. म्हाडा लॉटरीत पात्र ठरलेल्या एका लेखकासह विचित्र प्रकार घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्ही मालिका लिहिणाऱ्या एका लेखकाने म्हाडा सोडतीत कलाकार या कोट्यातून अर्ज भरला होता. त्याला घर देखील लागले. म्हाडाचे घर मिळाल्यानंतर त्याने कलाकार असल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सांस्कृतिक संचालनालयाकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांना जे उत्तर मिळाले ते एकूण त्यांच्यासह अनेक लेखकांना धक्का लागला आहे. लेखक हे कलाकार नाहीत असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे आता ज्या लेखकांना घरे मिळाली आहेत आणि ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. याप्रकरणी मानाचि संघटनेचे अध्यक्ष विवेक आपटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


लेखक सादरीकरण कलेत येत नाही. ज्यांनी फक्त लिखाण केले आहे त्यांना प्रमाणपत्र देऊ शकत नाही. ज्या लेखकांनी अभिनय केला आहे, अशांना कलाकार प्रमाणपत्र दिले जात आहे. मात्र, तरी आम्ही आता या संबंधित शासानासोबत पत्र व्यवहार करणार आहोत. 1988 सालच्या गृहनिर्माण आणि विशेष सहाय्य या विभागाच्या एका पत्रानुसार, तमाशा, नाटक , चित्रपट, शिल्पकार, कवी, कवाल, नकलाकार , शिल्पकार अहिर यांचा त्या पत्रात उल्लेख आहे. मात्र त्या पत्रात लेखकाचा उल्लेख नाही. आणि ज्या लेखकांना म्हाडाकडून घरे मिळाली आहे त्यांना साहित्यिक या कोट्यातून घरे मिळाली आहे.


म्हाडा सोडतीत लेखकांना स्थान नसल्याचे आता मनोरंजनसृष्टीत नाराजीचा सूर आहे. 'कलाकार'  या कोट्यात लेखकांच्या स्थनाबद्दल सांस्कृतिक विभाग शासानासोबत पत्र व्यवहार करण्यार असल्याचे संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता लेखक हे वंचित राहणार की त्यांना देखील कलाकार कोट्यात स्थान मिळणार हे लहान महत्त्वाचे असेल.


म्हाडाच्या 2 हजार 30 घरांसाठी नोंदणी करता येणार आहे. गोरेगाव, अँटॉप हिल, कोपरी पवई, कन्नमवारनगर, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड या भागात ही घरं असतील. या घरांसाठी  13 सप्टेंबरला लॉटरी काढण्यात येईल. अर्ज प्रक्रियेची लिंक दुपारी 12पासून उपलब्ध होईल. नागरिकांना 4 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या अर्जाची प्रारुप यादी 9 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रसिद्ध होणार आहे. ऑनलाईन दावे, हरकतींसाठी 9 सप्टेंबर दुपारी 12पर्यंतची मुदत देण्यात आलीये. तर अर्जाची अंतमि यादी 11 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता प्रसिद्ध होईल.