Girni Kamgar : गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 2521 घरांची सोडत, `या` तारखा लक्षात ठेवा
Mumbai News : गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात गिरीणी कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे.
Mhada Lottery For Girni Kamgar 2022 : बातमी गिरणी कामगारांसंदर्भातली...मुंबईतील (Mumbai News) 58 बंद गिरण्यांमधील 2521 (Girni Kamgar) कामगारांना आता त्यांचं हक्काचं घर मिळणार आहे. कारण गिरणी कामगारांच्या 2 हजार 521 घरांची सोडत (mhada lottery) अखेर निघणार आहे. 1978 ते 80 या कालावधीत मुंबईत झालेल्या गिरणी कामगारांच्या संपामुळे मुंबईतील 58 गिरण्या बंद पडल्या होत्या. यातील कामगारांना घरं मिळावी म्हणून अनेक आंदोलनं विविध पक्षांनी केली होती. ठाणे-रायगडमधील (Thane-Raigad) एमएमआरडीएच्या (MMRDA) भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातल्या घरांसाठी ही सोडत असेल.
म्हाडाकडे आता टाटा हाऊसिंग कंपनीने ठाणे जिल्ह्यातील रांजनोळीमध्ये 1244, विनय अगरवाल शिलोटर यांनी रायगड जिल्ह्यात रायचुरमध्ये बांधलेली 1019 तर सॅनव्हो व्हिलेज लि. ने कोल्हेमध्ये बांधलेली 258 घरं उपलब्ध झाली आहेत. यातील 6 सदनिका वगळता सर्व सदनिका 320 चौ. फुटांच्या आहेत. (Mhada Lottery For Girni Kamgar 2022 mumbai news Latest Marathi News)
'या' तारख्या लक्षात ठेवा!
अर्ज करण्यासाठी 19 डिसेंबर ते 17 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आलीय. घरांसाठी गिरणी कामगारांचे पावणे दोन लाख अर्ज प्राप्त झालेत. मात्र यात अनेक कामगारांनी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केले आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाने सोडतीसाठीच्या प्रारूप यादीतील 12 हजार 981 अर्जदारांची यादी वेबसाईटवर टाकलीय. यात एकापेक्षा अधिक अर्ज केलेल्यांनी तसंच दुबार नावं असलेल्यांनी म्हाडाकडे अर्ज करायचा आहे. कोणता एक अर्ज ग्राह्य धरायचा याबाबतचा विनंती अर्ज कामगारांना करावा लागणार आहे. त्यासाठी 19 डिसेंबर ते 17 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आलीय.
हेसुद्धा वाचा - Maha Vikas Aghadi Morcha : आज मुंबईतले 'हे' रस्ते बंद; महाविकास आघाडीचा मुंबईत हल्लाबोल
गिरणी कामगारांनी अर्ज कसा आणि कुठे सादर करावा पाहूयात..
अर्ज कसा करावा?
म्हाडा वेबसाईटवर जाऊन प्रारुप यादी तपासा
दुबार नाव किंवा दुरुस्ती असल्यास अर्ज करा
कोणतं नाव ग्राह्य धरायचं यासाठी विनंती अर्ज
लेखी पुरावा, सध्याचे छायाचित्र, ओळखपत्र सादर करा
म्हाडाच्या वांद्रे पूर्व इथल्या कार्यालयात अर्ज द्या