Mumbai Mhada Homes : शिक्षण, नोकरी सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर काही गोष्टींबाबत पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठीची धडपड सुरु होते. यातलंच एक स्वप्न म्हणजे स्वत:च्या हक्काचं घर घेण्याचं. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत (Mumbai) घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न होतं. पण, घरांच्या वाढत्या किमती पाहता मुंबईत तरी अनेकांनाच हा मैलाचा दगड गाठणं शक्य होत नाही. अशा सर्वांसाठी आणि हक्काचं घर घेण्याची धडपड करणाऱ्या प्रत्येकासाठी म्हाडा पुन्हा एकदा एक मोठी संधी घेऊन येणार आहे. थोडक्यात येत्या 10 दिवसांमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर होणार आहे. 


कोणासाठी असणार किती घरं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अत्यल्प गटासाठी 1 हजार 1
अल्प उत्पन्न गटासाठी 1 हजार 23
मध्यम उत्पन्न गटासाठी 18 
उच्च उत्पन्न गटासाठी 4 घरं (वेंगुर्ला)


कुठे घेता येणार हक्काचं घर? 
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या (vasai virar) वसई- विरार, ठाणे (thane), नवी मुंबई (navi mumbai), कोकणातील वेंगुर्ला (konkan vengurla) या भागांमध्ये घर घेण्यासाठीच्या संधी म्हाडाकडून देण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त पुणे, औरंगाबाद (Pune, Aurangabad) मंडळांतील घरांचीही जाहीरात म्हाडाकडून देण्यात येणार आहे. यामध्ये कोकणातील 2 हजार 46, औरंगाबादमधील 800, पुण्यातील 4 हजार 678 घरांसाठी जाहीरात देण्यात येईल. दरम्यान, सदर लॉटरीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे पात्र अर्जदारांनाच यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. 


हेसुद्धा वाचा:  Weather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! चक्रीवादळामुळं किनारपट्टी भकास; महाराष्ट्रातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता 


म्हाडाकडून सामान्यांना दिलासा 
काही काळापासून म्हाडाकडून घरांची Deposit रक्कम वाढवण्यावर भर देण्यात आला होता. आता मात्र अल्प, अत्यल्प गटाच्या अनामत रकमेतील कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय म्हाडानं घेतला आहे. सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा ठरत आहे.  मध्यम आणि उच्च उत्पन्न गटाची अनामत रक्कम मात्र काहीशी वाढू शकते. ही रक्कम वाढल्यास मध्यम- उच्च उत्पन्न गटातील वर्गाला मात्र काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.