Weather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! चक्रीवादळामुळं किनारपट्टी भकास; महाराष्ट्रातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता

Cyclone Mandous Updates : 'मंदोस' (Mandous ) नावाचं बंगालच्या उपसागरात घोंगावत पुढे येणारं चक्रीवादळ 9 डिसेंबर (आज) मध्यरात्री किनारपट्टीवर धडकणार असल्यामुळं ही रात्र वैऱ्याची आणि वादळाची आहे 

Updated: Dec 9, 2022, 07:35 AM IST
Weather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! चक्रीवादळामुळं किनारपट्टी भकास; महाराष्ट्रातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता  title=
IMD mandous Cyclone storm high alert in tamilnadu rain predictions in konkan and maharashtra amid winters

Cyclone Mandous Updates : 'मंदोस' (Mandous ) नावाचं बंगालच्या उपसागरात घोंगावत पुढे येणारं चक्रीवादळ 9 डिसेंबर (आज) मध्यरात्री किनारपट्टीवर धडकणार असल्यामुळं ही रात्र वैऱ्याची आणि वादळाची आहे असंच म्हटलं जात आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडूतील (Tamilnadu) मामलपुरम येथे वादळ धडकणार असल्यामुळं या भागात सोसाट्याचे वारे वाहणार असून, जोरदार पावसाची (Rain Updates) हजेरीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ताशी 85 किमी वेगानं वारे वाहणार असल्याचं सांगण्यात आल्यामुळं सदर भागातील किनारपट्टी परिसर निर्मनुष्य झाला असून, तिथं स्मशानशांतता पसरली आहे. खळाळणारा समुद्र आणि हळुहळू रौद्र रुप घेणारा वारा इतकीच हालचाल या भागात दिसत आहे. (IMD mandous Cyclone storm high alert in tamilnadu rain predictions in konkan and maharashtra amid winters)

(South coast) दक्षिण किनारपट्टीवरचं वादळ महाराष्ट्रातही थैमान घालणार 

तामिळनाडूमध्ये थेट परिणाम करणारं हे चक्रीवादळ महाराष्ट्रावरही प्नभाव पाडताना दिसणार आहे. कारण, हवामान विभागाच्या माहितीनुसार 15 डिसेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुजरातमध्येही याचे अंशत: परिणाम दिसून येतील. ऐन हिवाळ्यामध्ये पावसाच्या सरी बसरणार असल्यामुळं यंदाही हिवसाळा चुकलेला नाही अशाच प्रतिक्रिया सर्वसामान्य देत आहेत. 

महाराष्ट्रात कुठे देण्यात आला पावसाचा इशारा? 

9 ते 15 डिसेंबर या काळात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी असल्याचं सांगण्यात आलं आहे. इथं राज्यात मुंबईसह (Mumbai, thane, raigad, palghar, goa) ठाणे, रायगड, पालघर, गोवा किनारपट्टी आणि कोकण किनारपट्टीला (Konkan) पावसाचा तडाखा बसू शकतो. तर, विदर्भही या हिवाळ्यातील पावसामुळं ओलाचिंब होणार आहे. वादळाचे परिणाम म्हणून राज्यातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. हवामानात झालेल्या या बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 13 जिल्यांना अलर्टही देण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : 1 घर आणि 2 राज्यं, हॉल महाराष्ट्रात, किचन तेलंगणात, पाहा

तामिळनाडूमध्ये परिस्थिती गंभीर 

मंदोस चक्रीवादळाचे थेट परिणाम दिसून येणाऱ्या तामिळनाडूमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. गरज असल्यासच घराबाहेर पडा, असं आवाहनही शासनाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्याला धडक दिल्यानंतर हे वादळ पश्चिम- उत्तर पश्चिमेच्या दिशेनं पुद्दुचेरी आणि आंद्र प्रदेशच्या किनारपट्टीवरून पुढे जाणार आहे. वादळाचे परिणाम दक्षिणेकडील राज्यांमध्ये 10 डिसेंबरपर्यंत पाहिले जातील.