पुणे : पुणे म्हाडाच्या घरांसाठीची सोडत आज काढण्यात आली. म्हाडाच्या पुण्यातल्या  812 घरांसाठी 36 हजार 500 अर्ज आले होते. पुणे आणि पिंपरी - चिंचवड महापालिका हद्दीत ही घरं आहेत. पुण्यात स्वस्तात घर मिळाल्यानं विजेत्यांनी आनंद व्यक्त केला. म्हाडा नवीन वर्षात पुन्हा बंपर लाॅटरी काढणार असल्याची माहीती पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी दिली. या लॉटरीत एका मुकबधीर दांपत्याचं घराचं स्वप्न साकार झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत देखील 16 डिसेंबरला म्हाडाची सोडत निघाली. पुढच्यावर्षी म्हाडाच्या मुंबईतल्या घरांची संख्या दुप्पट होईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केली आहे. म्हाडा कोकण मंडळाच्या 5000 घरांची जाहिरात जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान येणार आहे. वसई, वेंगुर्ला, मीरारोड, ठाण्यात ही घरं असतील, असंही मेहता यांनी स्पष्ट केलं आहे.