टॉयलेटला गेला अन् टॉपर झाला! म्हाडा परीक्षेदरम्यान मोठा स्कॅम
MHADA Online Exam Student Dummy Scam: सध्या सगळीकडे परीक्षेला कॉपी (exam copy) करण्याचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढू लागले आहेत. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांवर कडक लक्ष ठेवणेही गरजेचे झाले आहे. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
MHADA Online Exam Student Dummy Scam: सध्या सगळीकडे परीक्षेला कॉपी (exam copy) करण्याचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढू लागले आहेत. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांवर कडक लक्ष ठेवणेही गरजेचे झाले आहे. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यातून आता ऑनलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांवर कडक लक्ष ठेवणेही गरजेचे झाले आहे. अशावेळी आता ऑनलाईन परीक्षांचे (online exam scam) वाईट परिणामही जगासमोर येऊ लागले आहेत. (MHADA online exam malpractice of a dummy candidate copying answers from the toilet is the latest marathi news)
ऑनलाईन परीक्षा सुरू असल्याचा फायदा घेत सतत प्रसाधनगृहात जाणाऱ्या उमेदवारांचे ‘टॉयलेट’ गुपित अखेर म्हाडाच्या अहवालातून उघडकीस आले आहे. प्रसाधनगृहात जाण्यापूर्वी शून्य प्रश्न सोडविणाऱ्या उमेदवारांनी प्रसाधनगृहातून आल्यानंतर थेट 100 ते 150 प्रश्न सोडविल्याची बाब समोर आली आहे. प्रसाधनगृहाच्या (toliet) बहाण्याने कॉपी करून टॉप केल्याचे स्पष्ट होताच राज्यभरातील 60 उमेदवारांविरोधात खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. म्हाडामध्ये प्रशासकीय अधिकारी प्राधिकरण म्हणून कार्यरत असलेले आशिष गजानन वैद्य (45) यांच्या तक्रारीनुसार म्हाडाच्या कर्मचाऱ्याच्या 14 क्षेणीतील एकूण 565 पदांसाठी यावर्षी 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील 106 केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झाल्या. आता या विद्यार्थ्यांची चौकशी होणार आहे.
यादरम्यान डमी उमेदवार तसेच इलेक्ट्रॉनिक्स उपकरणासह कॉपी करताना आढळून आल्याप्रकरणी राज्यात नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. करोना व्हायरस विळखा असल्याने प्रत्येक उमेदवाराचा बायोमॅट्रिक (biometric) डेटा ठेवणे शक्य नसल्याने सर्वांचे फोटो काढण्यात आले आहेत. निकाल लागल्यानंतर एकूण 565 पदांकरिता 1633 गुणवत्ताधारक उमेदवारांना कागदपत्र तपासणीसाठी बोलवले पण त्यापुर्वी या सर्व उमेदवारांचे टी.सी.एस. प्रा. लि कंपनीमार्फत केलेल्या तपासणीमध्ये 60 परीक्षेला बसलेले संशयित आढळून आले.
हेही वाचा - RBI नं घेतलेल्या कठोर निर्णयाचा शेअर मार्केटला फायदा, पाहा कुठे करावी अचूक गुंतवणूक
म्हाडा परीक्षेत गैरप्रकार कसे शोधले?
हा गैरप्रकार शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, लॉगिंग डिटेल्सवरून (logging details) अनेक माहिती शोधधारकांनी मिळाली. त्यात पकडलेल्या विद्यार्थ्यांचे सीसीटीव्ही फुटेज, लॉगिंग डिटेल्सबाबतचा अहवाल, उमेदवारांच्या कच्चा कामाचे कागद तसेच कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली. त्यांनी साधारण प्रश्नांची उत्तरे विचारली आणि या सगळ्यांतून त्यांनी केलेल्या चौकशीच्या सामान्य प्रश्न विचारून केलेल्या संक्षिप्त चौकशीच्या आधाराने म्हाडा प्रशासनाने अहवाल तयार केला आहे.
चौकशीत काय आढळले?
39 विद्यार्थांनी स्वत:चे डमी उमेदवार बसविले.
21 उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी पहिल्या तासात शून्य ते 20 प्रश्न सोडविले तर दुसऱ्या तासात प्रसाधनगृहात जाऊन आल्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसद्वारे 100 ते 150 प्रश्न सोडविले. प्रत्येक प्रश्न सोडविण्याची वेळ 6 ते 7 सेकंद असल्याची दिसून आली.