Mhada Lottery 2023 Winner list :  मुंबईत म्हाडाच्या लॉटरी सोडत अखरे काढण्यात आली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोडतीचा हा कार्यक्रम पार पडला. म्हाडा मुंबई मंडळाच्या 4 हजार 82 घरांची सोडत आज जाहीर झाली. 4083 विजेत्याची संपूर्ण यादी म्हाडाने आपल्या संकेत स्थळावर जाहीर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हाडाच्या मुंबईतल्या घरांसाठीच्या लॉटरीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबईत आपलं हक्काचं घर असावं अस स्वप्न पाहणाऱ्या लाखो लोकांनी म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज भरले होते. यामुळे विजेत्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पहायला मिळाला.


कोणत्या परिसरातील घरांसाठी होती ही लॉटरी


अंधेरी, जुहू, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायनमधल्या घरांसाठी ही सोडत होती. 4083 घरांसाठी 1 लाख 20 हजार 144 अर्ज दाखल झाले होते.  पात्र अर्जांची संगणकीय सोडत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काढण्यात आली. या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण देखील दाखवण्यात आले होते. 


अशी चेक करा विजयी अर्जदारांची यादी 


म्हाडाच्या लॉटरीत विजयी झालेल्या अर्जदारांना  म्हाडातर्फे नोंदणीकृत मोबाईल क्रमांवर मेसेज पाठवण्यात आले आहेत. तसेच म्हाडाच्या संकेत स्थळावर 4083 विजयी अर्जदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर ही यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या प्रवर्गातून अर्ज भरला आहे त्यानुसार ऑप्शन निवडून विजयी उमेद्वारांची यादी तपासता येणार आहे. 


ऑक्टोबर मध्ये कोकण विभागात 4 हजार 500 घराची लॉटरी 


ऑक्टोबर मध्ये कोकण विभागात 4 हजार 500 घराची लॉटरी निघणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. सर्वसामान्य माणसाला अतिशय कमी किमतीत घर मिळालं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे असं  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.