नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, ठिबक सिंचन योजनेतील भ्रष्टाचार तातडीने थांबवा, असं सुनावलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडकरी म्हणाले, ठिबक सिंचन योजनेतील भ्रष्टाचार तातडीने थांबवा, शेतकऱ्यांच्या हाती अनुदान पोहोचेपर्यंत काहीच शिल्लक राहत नाही, व्यासपीठावर मंत्री उपस्थित असताना नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलं.


ऑरेंज फेस्टीवल दरम्यान बोलताना तंबी


नितीन गडकरी यांनी नागपुरातील ऑरेंज फेस्टीव्हलच्या उद्घाटनादरम्यान मंत्र्यांना हा इशारा दिला.


ठिबक सिंचन करणाऱ्या कंपन्या १० रुपयांची वस्तू २० रुपयांना विकतात. यात शेतकऱ्य़ांचे दुप्पटचे पैसे खर्च होतात. 


थेट बँकेशी लिंक करण्याचं नियोजन


मुख्यमंत्र्यांनी आता या योजना थेट बँकेशी लिंक करण्याचं नियोजन केल आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असं वाटतं, असं नितिन गडकरी म्हणाले, ठिबक सिंचन योजनेसाठी सरकारकडून ५० टक्के अनुदान दिलं जातं.


दरम्यान, ऑरेंज फेस्टीव्हलला यापुढे राज्याचं पर्यटन विभाग मदत करेल, असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.