Microsoft Outage : शुक्रवारची सकाळ IT क्षेत्रासाठी फारशी समाधानकारक नव्हती. कारण ठरलं ते म्हणजे मायक्रोसॉफ्टमध्ये आलेला तांत्रिक बिघाड. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या माहितीनुसार क्राऊडस्ट्राईक अपडेटमुळं ही अडचण उदभवली असून, यामुळं टप्प्याटप्प्यानं माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सेवा पुरवणाऱ्या अनेक संस्थांचा खोळंबा झाला. ऑस्ट्रेलियापासून भारतापर्यंच याचे परिणाम दिसून आले. इथं महाराष्ट्रातही या संकटामुळं कोट्यवधींचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. 


जेएनपीटी बंदरात 7500 कंटेनर खोळंबले 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायक्पोसॉफ्टमधील तांत्रिक बिघाडाचा फकटा थेट नवी मुंबई आणि नाशिकपर्यंत दिसून आले. इथं असणाऱ्या जेएनपीटी बंदरामध्ये जवळपास 7500 कंटेनरच्या रांगा पाहायला मिळाल्या. मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे कंटेनरची नोंदणी रखडली आणि त्यामुळं अर्ध्या तासाऐवजी कंटेनर प्रवेशद्वारातून आतमध्ये येण्याच्या प्रक्रियेसाठी 13 ते 14 तास प्रतीक्षा करावी लागली. 


राज्यात नाशिकमधून येणारी फळं, भाज्या दुबई आणि आखाती देशांमध्ये पाठवली जातात. जात असता. जेएनपीटीतून ही वाहतूक होत असते.  मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे जेएनपीटीमध्येच कंटेनर अडकले आहेत. कंटेनरमधील भाजीपाला आणि फळं खराब होऊ नयेत यासाठी यामध्ये असणारी कोल्ड स्टोरेज सुविधा सतत सुरूच ठेवावी लागत असल्यामुळं वाहनही सुरू ठेवलं जात आहे. परिणामी डिझेलचा खर्च वाढत आहे. या सर्व गणिताचा फटका निर्यातीच्या गणिताला बसत असून या व्यवहारामध्ये निर्यातदारांना मोठं नुकसान होताना दिसत आहे. सदरील परिस्थिती बदलण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी अपेक्षित असून, यासाठी तीन कोटींहून अधिकचा वाढीव खर्च करावा लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. 


हेसुद्धा वाचा : Microsoft : संपूर्ण जग एका क्षणात थांबलं अस मायक्रोसॉफ्टमध्ये घडलं तरी काय? सत्या नडेला यांनी स्पष्टच सांगितलं...


 


इथं मायक्रोसॉफ्टच्या संकटानं डोकं वर काढलेलं असतानाच तिथं हवामानही निर्यातव्यवहाराला पुरेशी साथ देताना दिसत नाहीय. सध्या गुजरात ते केरळपर्यंत अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो अधिक तीव्र होताना दिसत आहे. परिणामी. मुंबई कोकणात पावसाचा जोर वाढत असल्यामुळं जेएनपीटीतून होणाऱ्या कंटेनर वाहतुकीवर याचा थेट परिणाम होत आहे. 


मुंबई विमानतळावरही गोंधळ 


मायक्रोसॉफ्टच्या क्राऊडस्ट्राईकचा फटका मुंबई विमानतळाला बसला असून, इथं कैक प्रवाशांचा खोळंबा होताना दिसत आहे. शुक्रवारप्रमाणेच शनिवारीसुद्धा इथं परिस्थिती सुधारली नसून अद्यापही काही विमानांची उड्डाणं प्रलंबित आणि रद्द केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरच मायक्रोसॉफ्टच्या अडचणीनं सामान्यांवरही परिणाम केल्याचं पाहायला मिळत आहे.