अलिबाग : रोहा येथील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील (Dhatav Industrial Estate in Roha) सुदर्शन कंपनीत (Sudarshan Company) मध्यरात्री भीषण आग (Midnight fire)  लागली. स्फोटामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, सुदैवाने जिवीत हानी नाही, मात्र कोट्यवधीची वित्तहानी झाली आहे. सुरूवातीला झालेल्या आवाजाने परिसरात मोठा हादरा बसला. आग इतकी भीषण होती की त्यामुळे रात्री संपूर्ण परिसरात आगीचा प्रकाश दिसत होता. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्‍यात असलेल्या धाटाव एमआयडीसी मधील सुदर्शन केमिकल लिमिटेड या कंपनीच्या डी.सी एल. स्टोअरेज प्लॅन्टला मध्यरात्री आग लागली. आग इतकी भीषण होती की रात्रीत संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. सुरूवातीला झालेल्या आवाजाने परिसरात हादरा बसल्याने स्फोट झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. रात्री पावणे बाराच्या सुमारास आग लागल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन आणि रोहा नगरपालिका तसेच एमआयडीसी अग्निशमन दलाच्या दोन तुकड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्यावर सुमारे तासाभरात आगीवर पूर्ण पणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. 


सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झालेली नसली तरी कंपनीने बनवलेले फायनल प्राॅडक्ट आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने कोट्यवधीची वित्तहानी झाली आहे. शाॅर्टसर्किट मुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आमदार अनिकेत तटकरे मदतकार्यात सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी माहीती दिली. प्रकल्प प्रमुख संजय शेवडे यावेळी हजर होते. स्थानिक पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या दोन तुकड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्यावर, सुमारे तासाभरात आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आले. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी कंपनीने बनवलेलं उत्पादन आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने, कोट्यवधींची वित्तहानी झाली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.