नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अखेर मिलींद एकबोटेला अटक करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने एकबोटेंचा जमीन अर्ज फेटाळला. त्यानंतर लगेचच एकबोटेंना पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली. आज एकबोटेंना दुपारी ११.०० ते ३.०० या वेळेत कोर्टात हजर केलं जाणार आहे.


कोरेगाव भीमा हिंसाचार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरेगाव भीमात एक जानेवारीला मोठा हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारामागे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप आहे. या दोघांच्या विरोधात दुसऱ्याच दिवशी म्हणजे २ जानेवारीला अॅट्रॉसिटी आणि दंगल भडकवण्याचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तब्ब्ल अडीच महिन्यांनी एकबोटेला अटक झाली आहे. या अडीच महिन्यात पोलिसांनी जमीन मिळण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याची संधी एकबोटेंना दिली. अडीच महिन्यात शिवाजीनगर कोर्ट त्यानंतर हायकोर्ट आणि आता सुप्रीम कोर्टापर्यंत अटकपूर्व जामिनासाठी एकबोटेने प्रयत्न केले. पण अखेर ते अयशस्वी ठरलेत.


कोरेगाव भिमा हिंसाप्रकरणाचा घटनाक्रम... 


- जानेवरीच्या पहिल्या तारखेस कोरेगाव भीमात मोठा जातीय हिंसाचार


- दोन जानेवारीला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल


- हिंसाचारात एक मृत्यू तर कोट्यावंधीचं आर्थिक नुकसान


- शिवाजीनगर कोर्ट, हाय कोर्टाने याआधीच एकबोटे यांचा अटकपूर्व  जामीन अर्ज फेटाळला होता


- त्यानंतर सुप्रीम कोर्टाने देखील एकबोटेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला


- १४ मार्च रोजी एकबोटेंना अटक


एकबोटेंचं तपासात सहकार्य नाही


अटक केल्यानंतर एकबोटेंना गुरुवारी कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.  सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे एकबोटे तपासासाठी ग्रामीण पोलिसांसमोर हजर होत होते. मात्र, तपासात सहकार्य करत नसल्याची पोलिसांची तक्रार होती. आता एकबोटेंना अटक केल्यानंतर कोरेगाव भीमा हिंसाचारात अनेक महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता आहे.