औरंगाबाद : मनसेप्रमुख राज ठाकरे (Mns Chief Raj Thackeray) यांना गुढीपाडव्याच्या सभेत भोंग्यावरुन वक्तव्य केलं. यानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलून गेलं. गेल्या काही दिवसांपासून राज्यात राज ठाकरे यांच्या विधानाचे पडसाद पाहायला मिळाले. मोठा राजकीय राडा पाहायला मिळाला. दरम्यान राज ठाकरे यांच्या राजकारणाबाबत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Assuddin Owaisi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (mim chief asaduddin owaisi give reaction over to mns chief raj thackeray and uddhav thackeray)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ओवैसी काय म्हणाले?


"राज्यात दोन भावांचं भांडण सुरू आहे. आम्हाला त्यात काय करायचंय. मात्र या सर्वात कायदा सुव्यवस्था बिघडू नये" अशी प्रतिक्रिया ओवैसी यांनी राज ठाकरे यांचं महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणाबाबत आणि एकूणच भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं, या प्रश्नावर दिली. ते औरंगाबादेत बोलत होते. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ओवैसी यांना इफ्तार पार्टीसाठी औरंगाबादेत आमंत्रित केलं होतं.
 
"तुम्ही कुणाला सभेला परवानगी देत असाल तर तिथे कायदा आणि सुव्यस्था राखण्याची तुमची जबाबदारी आहे. आम्हाला आशा आहे की ते ती जबाबदारी निभावतील" अशी आशाही ओवैसी यांनी व्यक्त केली. 


दरम्यान राज ठाकरे यांची उद्या (1 मे) औरंगाबादेत जाही सभा आहे. तर असदुद्दीन ओवैसी  हे नांदेडमध्ये सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते काय बोलणार, याकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.