औरंगाबाद : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद पोलीस (Aurangabad Police) राज ठाकरे यांच्या चौकशीसाठी मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती देखील पुढे आली आहे. राज ठाकरे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यावरुन औरंगाबादचे खासदार इम्पतियाज जलील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दिलीप वळसे पाटील (Dilip walse patil) यांनी मुद्दाम तेच मैदान मनसेला दिले. औरंगाबादच्या मधोमध हे मैदान आहे. बाहेर जागा द्यायला हवी होती, मात्र ठरवून हे मैदान दिले. औरंगाबाद पोलीस विरोधात होती तरी सुद्धा वळसे पाटील यांनी मैदान दिले. यांना दंगल करायची होती का? पाटील उत्तर द्या.'


'3 दिवस पोलिसांनी अभ्यास केला आणि आता हे तर खोदा पहाड निकला चुहा असं झालंय. सगळ्यानी मिळून हे सोपे कलम लावले आहेत. कारवाई केली बरं, फक्त थातूर मातूर कारवाई करू नका. फक्त कारवाई दाखवायची होती म्हणून ही कलम लावली?'


'भाषणावेळी अजाण सुरू झाली तर पोलिसांना तुम्ही सांगता त्या अजाण देणाऱ्या त्यांचा तोंडात बोळे कोंबा. हे शब्द ते वापरतात,मला सरकारला स्पष्ट विचारणे आहे. मी नवनीत राणा समर्थक नाही मात्र त्या मुख्यमंत्री घरासमोर येऊन हनुमान चालिसा म्हणणार म्हणतात तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आणि हे इतके बोलतात तर यांना जामीनपात्र गुन्हे. यातील फरक तरी आता सरकारने सांगावे. माझी विनंती आहे पोलिसांनी जबाबदारी पार पाडावी.'


'मला सरकारला एक विचारायचं आहे. तुम्ही 153 लावले आहेत त्यापेक्षा 153 A लावले असते तर स्ट्रॉंग गुन्हा झाला असता. कारण त्यांनी 2 समाजात वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.' असं देखील जलील यांनी म्हटलं आहे.