नितेश महाजन, झी मीडिया, औरंगाबाद : विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे एमआयएमचे (AIMIM) खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना विधानपरिषद निवडणुकीत पराभूत करण्यासाठी भाजप पूर्णपणे ताकद पणाला लावणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ खडसे यांना उमेदवारी न देण्याच्या अटीवर भाजप ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तयार होती, असा गौप्यस्फोट इम्तियाज जलील यांनी केला आहे. जलील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे


तसंच पंकजा मुंडेंना पक्षात संधी मिळाल्यास पंकजा मुंडे (Pankaja Munde) भविष्यात अडचणीच्या ठरतील म्हणून त्यांना विधान परिषद निवडणुकीत संधी दिली गेली नाही असंही जलील यांनी म्हटलं आहे.


पंकजा यांना संधी न मिळाल्याने तुम्ही ओबीसींची ताकद दाखवा, असा सल्ला मी पंकजा मुंडेंना दिल्याचंही जलील म्हणाले. एकेकाळी जे गोपीनाथ मुंडे यांचे चेले होते तेच आता पंकजा मुंडे यांना भाजपात नाकारत असल्याची टीका जलील यांनी केली. भाजप मोठ्या यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचं देखील जलील म्हणाले आहेत.