अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती :  मागील 55 दिवसांपासून दिल्लीच्या सिमेवर पंजाब, हरियाणा मधील शेतकर्यांचे शांततेच्या मार्गावर आंदोलनं सुरु आहे. मागील 55 दिवसांपासून त्यांनी हे आंदोलन लावून धरले आहे. त्यातून अपेक्षा होत्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करतील. पण तसे झाले नाही कारण पंतप्रधान मोदींचा हेखेखोर पना आडवा आला अशी जहरी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कृषी कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृषी कायदे रद्द करण्यासाठी देशाच्या राज्या राज्यात हे आंदोलनं पेटत आहे. उद्या प्रजासत्ताक दिन आहे खरं तर देशात प्रजा ही राजा असली पाहिजे. मग देशाचे पंतप्रधान असो की राज्याचे मुख्यमंत्री, आमदार खासदार हे त्याचे सेवक असले पाहिजे. मात्र मोदींच सरकार हे विसरले आहे की प्रजा राजा आहे. आणि आपण सेवक आहे. परंतु आता प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून आम्हाला अपेक्षा की शेतकरी राज्याने कृषी कायदा संदर्भात ज्या मागण्या केल्या त्या पूर्ण कराव्या अन्यथा देशभरात उग्र आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही असं राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले 



मुंबईत राज्यपाल यांच्या घराला सर्वपक्षीय नेते हे घेराव घालणार आहे. ही आनंदाची बाब आहे. अस प्रथमच होत आहे. त्यामुळे शेतकरी राजाचा विजय झाला आहे. आता राज्यपाल यांनीही राष्ट्रपती यांना कळवून हे कायदे रद्द करावे अशी मागनीही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.