मुंबई : कार्तिकी एकादशीनिमित्त महसूल मंत्री चंद्रकांत पाटूल यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांच्यासोबत विठ्ठलाची पूजा करण्याचा मान कर्नाटकमधील बळीराम शेवु चव्हाण आणि शिनाबाई चव्हाण या वारकरी दांपत्याला मिळाला.


राज्यातील शेतक-याचे उत्पादन वाढू दे, त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव देण्याची आमची क्षमता वाढू दे असं साकडं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विठुरायाच्या चरणी घातलं.


मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते चंद्रकांत पाटीलांचा सत्कार करण्यात आला. कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातून तीन लाख भावीक पंढरपुरात दाखल झालेत.



दर्शनासाठी भाविकांना १८ ते १९ तास लागत आहेत. मंदिर समितीतर्फे ८९ सीसीटीव्ही कॅमे-याद्वारे सगळीकडे बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे.