वाशिम : गारपिटीमुळं नुकसान झालेल्या शेतक-यांना धीर देण्याऐवजी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चक्क एका शेतक-याला दम भरला. 


...आणि रावते भडकले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील जोगेश्वरी गावाला रावते यांनी भेट दिली. तिथल्या शेतक-यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी रावते यांच्याकडे मागणी केली. त्यावेळी मंत्री मोहदय मदत मागणाऱ्या शेतकऱ्यांवरच भडकले.


काय म्हणाले होते शेतकरी?


विदर्भ आणि मराठवाडाच्या काही भागातील नुकसानग्रस्त भागाला आज राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भेट दिली आहे. आज अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतलीय. या शेतकऱ्याचं एवढंच चुकलं कि त्यांनी मंत्री साहेबांना "नुकसान १००% झाल, मात्र मदत काहीच मिळाली नाही" एवढा प्रश्न विचारला.