भारताच्या आरोग्य राज्यमंत्र्यांना सरोगसी माहित नाही?
धक्कादायक प्रकार
औरंगाबाद : औरंगाबादेमध्ये भारताचे आरोग्य राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना सरोगसी कायद्याबाबत विचारणा करण्यात आली मात्र हा काय प्रकार आहे तेच त्यांना उलगडेना. त्यात बाजूलाच बसलेले डॉ टाकळकर यांनी त्यांना समजेल अशा भाषेत समजावण्याचा प्रयत्न केला मात्र मंत्री महोदयांच्या काहीच पचनी पडत नव्हते. अखेर, बाजूला बसलेल्या डॉक्टरांनी त्यांना सांगितल्यावर मंत्री साहेबाना जसे जमले त्या शब्दात त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि वेळ मारून नेली, मात्र केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनाही सरोगसी याची माहिती नाही म्हटल्यावर तिथे उपस्थित असलेले डॉक्टर आणि पत्रकारांना हसू काही आवरले नाही.