Pune Chinchwad Bypoll Election Results : चिंचवड पोटनिवडणुकीचा (Chinchwad by-election) निकाल जाहीर झाला आहे.  भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे नाना काटे यांचा अश्विनी जगताप यांनी पराभव केला आहे. तब्बल 36 हजार मतांनी अश्विनी जगताप यांनी ही निवडणूक जिंकली आहे. राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमुळे अश्विनी जगताप यांची विजयाची वाट कठिण बनली होती. मात्र, शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी डाव फिरवला. देवेंद्र फडणवीस यांच्या जबरदस्त चाणक्य निती वापरत एकत्र हजारो मतं अश्विनी पाटील यांना मिळवून दिली. यामुळेच अश्विनी जगतापांच्या विजयाचे किंग मेकर मंत्री तानाजी सावंत ठरले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांचा 36 हजारपेक्षा जास्त मतांनी विजय झाला आहे. जगताप यांनी राष्ट्रवादीच्या नाना काटेंचा पराभव केला आहे. जगताप यांना 1 लाख 31 हजारांपेक्षा जास्त मतं पडली आहेत. तर नाना काटे यांना 96 हजार मतं मिळाली आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटांचे बंडखोर राहुल कलाटे यांनी तब्बल 40 हजारांच्या आसपास मतं घेतली आहेत. त्यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं विजयी उमेदवार अश्विनी जगताप यांनी मान्य केलं. 


मंत्री तानाजी सावंत यांनी नेमक केल तरी काय?


अश्विनी जगताप यांच्या विजयाचे किंग मेकर मंत्री तानाजी सावंत ठरले आहेत. भाजपचा हा मतदार संघ शिवसनेच्या मंत्र्यांनी मतदारांनी तारला आहे. अश्विनी जगताप यांच्या विजयात आरोग्य मंत्र्यांच्या JSPM ( जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ) संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी प्रचारात मोलाचा वाटा उचलला. 


चिंचवड मतदार संघातील मूळ उस्मानाबादकर असलेल्या मतदारांवर सावंतांचा प्रभाव आहे. पडद्या मागून आरोग्य मंत्र्यांची चाणक्य निती पहायला मिळाली. भाजपच्या हातून जाणारा मतदार संघ शिवसेनेच्या अर्थात शिंदे गटाच्या मंत्र्यामुळे तरला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये JSPM संस्थेचे सुमारे 15 हजारहून अधिक कर्मचारी आहेत.  ही संस्था सावंताची असून संस्थेतील अनेक कर्मचारी हे त्याच मतदार संघातले मतदार आहे. या शिवाय भूम वाशी परंडा या मतदार संघातील अनेक नागरिक हे पुण्यात विशेषता चिंचवडमध्ये नोकरी निमित्त स्थायिक आहेत. या सर्वांची गोळा बेरीज करून स्वत:ची यंत्रणा राबवून तानाजी सावंत यांनी विजय खेचून आणला. 


यात राहुल कलाटेंचा अपक्ष अर्ज ठेवण्यातही सावंतांची भूमिका महत्वाची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  सावंत आणि जगताप हे एकमेकांचे व्याही देखील आहेत. त्यामुळेच महिनाभर सावंत हे चिंचवड मध्ये ठाण मांडून होते. त्यामुळे जगतापांचा विजय हा सुकर झाला.