Nashik Crime News : देशभरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोलकत्तानंतर बदलापूर प्रकरणानंतर देशभरातील अनेक घटना समोर येत आहेत. नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या देवळाली गावात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने आपलं आयुष्य संपवलंय. एका तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून पीडित मुलीनं विषारी औषध घेऊन आत्महत्या केलीय. याप्रकरणात नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.. मृत मुलगी देवळाली कॅम्पमधील महाविद्यालयात शिकत होती. रस्त्यानं जाता येता आरोपी तिला छेडत होता. तसंच त्यानं आणि त्याच्या कुटुंबियांनी पीडित मुलीकडे लग्नाचा तगादा लावला होता आसा आरोप मृत मुलीच्या कुटुंबियांनी केलाय. या त्रासाला कंटाळून मुलीनं टोकाचे पाऊल उचले. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता तिला मृत घोषित करण्यात आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोल्यातही अशीच एक धक्कादायक घटना घडलीय. तरुणाच्या जाचाला कंटाळून एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. 'माझ्या सोबत संबंध ठेव नाहीतर तुझे फोटो व्हायरल करणार', अशी धमकी एका तरुणीला पीडित तरुणीला देत होता. तरुणाच्या या रोजच्या जाचाला कंटाळून तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पीडित तरुणी ही मूर्तिजापूर येथे शिक्षण घेण्यासाठी यायची. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ही तरुणी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. पण तरुणाच्या त्रासाला कंटाळल्याने तिच्यावर जीव देण्याची वेळ आली आहे.