ठाणे : मिरा - भाईंदर महापालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आज संपणार आहे. प्रचाराच्या तोफा संध्याकाळी पाच वाजता थंडावतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी गुरूवारी प्रचार शिगेला पोहचल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तर शिवसेनेच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेतल्या. 


मिरा भाईंदरवासियांना २४ तास पाणी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. 'गेल्या २५ वर्षांत मिळाला नाही एवढा निधी आम्ही मिरा भाईंदर पालिकेला दिला. मेट्रो आणण्याचं श्रेय भाजपचंच आहे' असा दावाही त्यांनी यावेळी केला.


तर दुसरीकडे, मिरा भाईंदरमधल्या ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलंय. भाजपच्या फोडाफोडीच्या आणि पैसे वाटण्याच्या राजकारणावर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं.