मीरा-भाईंदर पालिकेसाठी मतदानाला सुरुवात
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या २४ प्रभागांमधील ९५ वॉर्डसाठी आज निवडणूक होत आहे. त्यासाठी
आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवलेला पाहायला मिळत आहे. यामध्ये एक वॉर्डमधून बिनविरोध निवड झाल्याने, आज ९४ वॉर्डसाठीच मतदान होणार आहे. निवडणुक, सुरक्षा यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे.
किती आहेत मतदार ?
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण ५ लाख ९३ हजार ३३६ मतदारांची नोंद आहे.
यात पुरुष मतदार हे ३ लाख २१ हजार ७७० तर २ लाख ७१ हजार ५४९ हे महिला मतदार आहेत. इतर मतदार १७ आहेत.
कशी आहे व्यवस्था ?
ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी ९ निवडणूक अधिकारी कार्यरत आहेत.
मतदानासाठी एकूण ७७४ मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत.
मतदान निवडणुकीसाठी शहरात सुमारे ४ हजार ७५० पोलिस आहेत.
तीन दिवस शहरामध्ये १६१ पोलीस अधिकारी, १ हजार ८४२ पोलीस कर्मचारी आणि ३०० होमगार्ड तैनात आहेत.