Mira Road Murder Case: मिरा रोडमध्ये 32 वर्षीय सरस्वती वैद्य (Saraswati Vaidya) यांच्या हत्येमुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. सरस्वती वैद्य (Saraswati Vadiya) यांची त्यांचाच लिव्ह-इन पार्टनर मनोज साने (Manoj Sane) याने हत्या केली. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि कुकरमध्ये शिजवले. पोलीस जेव्हा घरी पोहोचले होते तेव्हा सगळीकडे मृतदेहाचे तुकडे होते. याप्रकरणी आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यातच आता पोलीस तपासात मनोज सानेला सेक्सची आवड होती असं समोर आलं आहे. अनेक डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून तो तरुणींच्या संपर्कात होता. यातूनच दोघांमध्ये भांडणं होत होती. दरम्यान, मनोजने पोलिसांना सांगितलं आहे की त्या दुर्धर आजार होता तसंच तो नपुंसक आहे. पोलीस त्याचा हा दावा पडताळण्यासाठी वैद्यकीय तपासणी करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांना प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, डेटिंग अॅप्सवरुन झालेल्या भांडणातूनच हत्या झाला असावी अशी शंका आहे. तसंच तपासात आरोपी अश्लील वेबसाइट्सवर नेहमी सक्रीय होता असंही समोर आलं आहे. त्याच्या माध्यमातून तो तरुणींच्या संपर्कात राहत होता. पोलिसांना त्याच्या मोबाइलमध्येही अनेक अश्लील फोटो सापडले आहेत. 


आरोपी मनोज सानेचा दावा आहे की, सरस्वतीने आत्महत्या केली आहे. पण पोलीस त्याचा हा दावा मान्य करण्यास तयार नाहीत. मनोज याने हत्याच केली आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. आता त्याने नेमकं कशाप्रकारे ही हत्या केली आहे याचाच तपास करायचा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 


आतापर्यंतच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इलेक्ट्रिक करवत आणि चाकूचा वापर केला. मृतदेहाचे तुकडे करत असतानाच करवतीची चेन तुटली होती. यामुळे ती दुरुस्त करण्यासाठी पाठवली होती. पोलिसांना फ्लॅटमधून काही किटकनाशकं सापडली आहेत. आता या किटकनाशकांचं सेवन केल्यानेच सरस्वतीचा मृत्यू झाला की याचा तपास पोलीस करत आहेत. 


सरस्वती मनोज सानेशिवाय इतर कोणालाच ओळखत नव्हती. तसंच इतर कोणाशी ओळख करण्याची तिची इच्छाही नव्हती. मनोज सानेने तिला आपल्या बहिणीशीही संपर्क करु दिला नव्हता. दोघं गेल्या तीन वर्षांपासून मीर रोड पूर्व येथील गीता आकाशदीप इमारतीच्या सातव्या मजल्यावर राहत होते. 


7 जूनला हत्येचा उलगडा


गीता आकाश दीप सोसायटीमधील लोकांनी 7 जून रोजी पोलीस ठाण्यात फोन केला. मनोज साने यांच्या फ्लॅटमधून दुर्गंध येत असल्याने त्यांनी फोन केला होता. पोलिसांना आतमध्ये काय असेल याची अजिबात कल्पना नव्हती. पण जेव्हा दरवाजा उघडून ते आत शिरले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकरली. घरामध्ये ठिकठिकाणी मृतदेहाचे तुकडे होते. तीन बादल्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे भरुन ठेवले होते. तसंच कुकरमध्येही शिजवण्यात आले होते. अर्धवट कापलेला मृतदेहही तिथेच होता. हे सर्व पाहून काही पोलीस कर्मचारी उलट्याही करु लागले होते. आरोपी मनोज साने याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला अटक केलं.