Mira Road Murder Case: मीरा रोड हत्याप्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी मनोज साने आणि मयत तरुणी सरस्वती वैद्य हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे सुरुवातीला बोललं जातं होतं. मात्र, प्रत्यक्षात त्या दोघांनी मंदिरात लग्न  केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी मनोज साने यांने अत्यंत थंड डोक्याने सरस्वतीची हत्या केली असून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याबाबत त्याने गुगल सर्चदेखील केले होते, असंही कळतंय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ओटीटीवर एक वेबसीरिज पाहून सरस्वतीला मारण्याचा प्लान बनवला होता. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याबाबत त्याने गुगल सर्चदेखील केले होते. इतकंच नव्हे तर, मृतदेहाचे तुकडे करण्यापूर्वी त्याने सरस्वतीच्या मृत शरीराचा फोटोदेखील काढला होता. तो फोटो आणि मोबाइल सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. 


आरोपी मनोजच्या जबाबानुसार, सरस्वतीची आठवण जपण्यासाठी तिच्या मृतदेहाचा फोटो त्याने काढला होता. पोलिसांनी जप्त केलेल्या फोनमधील फोटोत सरस्वतीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसत असल्याचंही बोललं जात आहे. मनोजचा मोबाईलमध्ये असलेला तिचा फोटो आणि त्याने सर्च केलेली गुगल हिस्ट्रीदेखील या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. मात्र, सरस्वतीच्या हत्येनंतर त्याने तिच्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केला आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. 


सरस्वतीच्या मृतदेह कुजू नये किंवा दुर्गंधी पसरु नये म्हणून त्याने गुगलवर उपाय शोधले होते. पोलिसांना त्याच्या घरात निलगीरी तेलाच्या पाच बॉटलदेखील सापडल्या होत्या. त्यासोबत इलेक्ट्रिक कटर व झाडं कापण्याची करवतदेखील सापडली होती. त्यामुळंच त्याने ही हत्या व्यवस्थित प्लान करुन केली होती, असा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. 


मनोज सानेने आपल्या जबाबात श्रद्धा वालकर हत्याकांडाचा प्रभाव असल्याचेही म्हटलं आहे. त्याने श्रद्धा वालकरप्रमाणेच सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचे शक्य तितिके लहान तुकडे करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्याने इलेक्ट्रिक कटरचा वापर केला. त्यानंतर त्याचे काही भाग कुकरमध्ये शिजवले, तर काही गॅसवर भाजले. मृतदेहाचे काही भाग त्याने फ्लशदेखील केले होते. पण त्यामुळं सोसायटीचा पाइप तुंबला. त्यानंतर त्याने कुत्र्यांना तुकडे टाकण्यास सुरुवात केली. 


सरस्वती वैद्य ही अनाथ होती. तिचं शिक्षण नगर शहरातील जानकी आपटे अनाथ आश्रम या संस्थेत झालं होतं. याच ठिकाणी ती आधी राहत होती त्यानंतर नोकरी शोधण्यासाठी मुंबईला गेली होती.मुंबईला जाण्यासाठी तिला दाखल्याची गरज होती मात्र दाखला देत नसल्याने तिने या संस्थेवर पाच वेळा केसही केलेली आहे. माझा मामा मुंबई येथे आहे आणि त्यांनी मला ओळखले असून मला त्याच्याकडे जायचे असे सांगून ती मुंबईला निघून गेली होती. माझ्या मामाकडे कपड्याच्या मोठमोठ्या मिल असून मी इकडे खुश असल्यास तिने अहमदनगरमध्ये संस्थेमध्ये सांगितले होते.