अंबरनाथमध्येही गाजला मिसळ महोत्सव
अंबरनाथमध्ये शिवमंदीर फेस्टिवलच्या दुस-या दिवशी युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली.
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये शिवमंदीर फेस्टिवलच्या दुस-या दिवशी युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या प्रसिद्ध गायक महेश काळे यांचा सत्कार करण्यात आला.
महेश काळेंनी गायलं सूर निरागस हो
फेस्टिवलच्या दुस-या दिवशी महेश काळे यांनी सूर निरागस हो, हे गाणं सादर करत रसिकांची मनं जिंकली. दुस-या दिवसाचं आणखी एक आकर्षण ठरलं ते म्हणजे खवय्यांसाठी आयोजित करण्यात आलेला मिसळ महोत्सव.
मिसळ महोत्सवाला चांगला प्रतिसाद
संगीत, चित्र आणि शिल्पकलेच्या या मांदियाळीत महाराष्ट्राच्या अस्सल खाद्या परंपरेतील एक प्रमुख स्थान असलेल्या मिसळ महोत्सवाला चांगला प्रतिसाद लाभला. हजारो खवय्यांनी मिसळ महोत्सवातील निरनिराळ्या चवींच्या मिसळीचा आस्वाद घेतला.