उस्मानाबाद : उस्मानाबादच्या उमरग्यात गारपीटग्रस्त शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे करताना त्यांचे आरोपीप्रमाणे फोटो काढल्याप्रकरणी दोषींना २४ तासात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी हे आदेश दिलेत. उमरगा तहसीलदार, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांना हे आदेश देण्यात आलेत. या प्रकरणी उमरग्याचे उपविभागीय अधिकारी चौकशी करणार आहेत. 


अधिका-यांकडून शेतक-यांची क्रूर चेष्टा करण्यात आल्याचे झी मीडियाने समोर आणलं होतं. झी मीडियाच्या दणक्यानंतर या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आलेत.