मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेची उत्सुकता मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासहित संपूर्ण महाराष्ट्राला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करणार आहेत.


फेसबुक पेजवरून निमंत्रण 


मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेचे निमंत्रण एव्हाना सर्वांपर्यंत पोहोचलयं. मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरूनही याबद्दल आवाहन करण्यात आलयं. पण हे निमंत्रण देताना एक मोठी चूक झाल्याचे दिसते.


AM आणि PMचा घोळ


सभा संध्याकाळी ५ ते ९ असताना सकाळच्या ५ ते ९ ची वेळ यामध्ये देण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत पेजवर AM आणि PM चा घोळ हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. 


चूक बदलणार का ?



मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी ही ही चूक निदर्शनास आणून दिलीय. आता यामध्ये कधी बदल होतोय हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.


...आणि बदल झाला



ही चूक लक्षात येताच यामध्ये आता बदलही करण्यात आलाय.