नांदेड : ट्रकने धडक दिल्याने कार पैनगंगा नदीपात्रात कोसळल्याने या झालेल्या अपघातात तीन जण ठार झालेत. या कार अपघातात आमदार अनिल गोटे यांचे बंधू ज्ञानेश्वर गोटे, त्यांची पत्नी रत्ना ज्ञानेश्वर गोटे यांचा अपघाती मृत्यू झाला.उमरखेड हदगाव मार्गावरील पुलावर हा अपघात झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर बोरी तुळजापूर महामार्गावरील ही घटना घडली.   गोटे यांच्या फोर्डफिगो गाडीला पैनगंगा नदीच्या पुलावर मागून एका ट्रकने जोराची धडक मारल्याने कार पुलावरून थेट नदीत कोसळली. यात ज्ञानेश्वर गोटे, त्यांची पत्नी रत्ना गोटे आणि कारचा चालक यांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. अपघातानंतर फरार झालेल्या ट्रक चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


पुलाला कठडा नसल्याने कार थेट नदीतच कोसळली. तिघांनाही कारमधून बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि पाण्यातच तिघांचा अंत झाला. दरम्यान, कारला धडक देऊन ट्रक चालकाने पलायन केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली. तिघाचेही मृत्यूदेह हदगाव येथील उपजिल्हारूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत.