शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या गाड्यांना अपघात, 8 ते 10 गाड्या धडकल्या!
उद्घाटन न झालेल्या समृद्धी महामार्गावर ताफ्यातील गाड्यांचा अपघात
Arjun Khotkar : दसरा मेळाव्याच्या पूर्वसंधेला दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या माजी मंत्री अर्जुन खोतकरांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला आहे. खोतकरांच्या नेतृत्त्वाखाली निघालेल्या गाड्यांचा दौलताबादजवळ 8 ते 10 गाड्या धडकलेल्या आहेत. उद्घाटन न झालेल्या समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांसाठी उद्घाटनाआधीच समृद्धी महामार्ग खुला करण्यात करण्यात आल्याने मोठा वाद रंगला आहे. (MLA Arjun Khotkar convoy accident on samrudhi Mahamarg latets marathi news)
समोरील गाडीने ब्रेक मारल्याने बाकी गाड्या एकमेकांना धडकल्यामुळे हा अपघात झाला आहे. 500 वाहनांचा ताफा मुंबईकडे निघालेला आहे. मात्र महामार्ग अद्याप सुरू झाला नसतानाही अपघात झाल्याने गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. या अपघातात काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.