MLA Bachu Kadu : शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (MLA Bachu Kadu) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. बच्चू कडू  त्यांच्या आक्रमक कामाच्या पद्धतीमुळे ओळखले जातात. त्यामुळे ते अनेकदा अडचणीत देखील सापडले आहेत. असाच काहीसा प्रकार अमरावती जिल्ह्यात (Amravati News) पहायला मिळाला. अचलपूर तालुक्यातील गणोजा गावात बच्चू कडू गेले असताना त्यांनी थेट एका आपल्याच कार्यकर्त्यांच्या कानशिलात लगावली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (MLA Bachu Kadu slapped a person in amravati over allegation about road construction)


नेमकं काय झालं-


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्ते कामाची (Road construction) पाहणी करत असताना या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपाने वातावरण तापलं होतं. गणोजातील एका कार्यकर्त्याने गंभीर आक्षेप घेतला. त्यामुळे बच्चू कडू यांनी रस्त्याची सविस्तर पाहणी केली. कार्यकर्त्याने आपली बाजू त्यांच्यासमोर मांडली. ठेकेदार आणि इंजिनियरसमोर यांनी देखील कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं.


रस्त्याचं काम ज्या भागासाठी मंजूर झालं, त्या भागात रस्ता झाला नाही, अशी तक्रार कार्यकर्त्यांनी केली. रस्ता झालाय तर मग कुठं गेला, असा प्रश्न विचारल्यावर बच्चू कडू यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट कार्यकर्त्यांच्या कानाखाली लगावली(MLA Bachu Kadu slapped a person). तू मुर्खासारखं काहीही बोलतोय, असंही कडू यावेळी म्हणाले होते.


मुर्खांना तुम्ही मुर्खात काढू नका, असं कार्यकर्त्याने म्हणताच बच्चू कडू यांचा पारा चढला. तू पहिल्यांदा ऐकून घे, असा दम बच्चू कडू यांनी या कार्यकर्त्याला दिला. त्याचवेळी बच्चू कडू यांनी त्याच्या कानाखाली मारली आणि शांत बस, असा दम देखील दिला.


पाहा व्हिडीओ-



बच्चू कडू यांचं स्पष्टीकरण-


मी त्या कार्यकर्त्याला मारहाण केली नाही, मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कार्यकर्त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मी त्या कार्यकर्त्याला थांब म्हटलो. त्यामुळे याला मारहाण म्हणत नाही. थांब म्हणणं आणि मारहाण यात फरक असतो. आमचं कार्यकर्त्यांसोबत कौटुंबिक नातं असल्याचं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.