Bacchu Kadu And Sachin Tendulkar : क्रिकेटचा विक्रमादित्य आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या  (Sachin Tendulkar)  अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविरोधात माजी मंत्री बच्चू कडू ( MLA Bacchu Kadu ) आक्रमक झाले आहेत. त्यांनी चक्क सचिनला कोर्टात खेचण्याची तयारी सुरु केली आहे. बच्चू कडू हे सचिन तेंडुलकरला कोर्टात का खेचणार? नेमका काय वाद झालाय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट ज्यांचा धर्म आहे... सचिन तेंडुलकर त्यांचा देव आहे... क्रिकेटमधला विक्रमादित्य... भारतरत्न... शांत स्वभावाचा सचिन तेंडुलकर.  टीकाकारांनाही त्यानं आपल्या बॅटनेच उत्तर दिले. मात्र, हाच क्रिकेटचा देव आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. क्रिकेटच्या या देवाला आता कोर्टात उभं राहावं लागणार आहे. आमदार बच्चू कडू सचिनविरोधात मैदानात उभे ठाकले आहेत.


बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरला का पाठवली कोर्टाची नोटीस


ऑनलाईन गेम्सच्या जाहिरातीप्रकरणी बच्चू कडूंनी सचिनविरोधात दंड थोपटले आहेत. सचिनला आता ते नोटीस पाठवण्याचीही तयारी करतायत.. एवढंच नाही तर सचिनविरोधात आंदोलनाची घोषणाच त्यांनी केली आहे. सचिनने ऑनलाईन जाहिरातीतून माघार घ्यावी असा इशारा बच्चू कडूंनी याआधीही दिला होता. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही पत्र पाठवलं होतं. 


बच्चू कडूंनी लिहिलेल्या पत्रात काय? 


पेटीएम फर्स्ट गेम या जुगाराची जाहिरात भारतरत्न सचिन तेंडुलकर करीत आहेत. सचिन तेंडुलकर हे प्रसिद्ध क्रिकेटपटू असून भारतात त्यांचे लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत चाहते आहेत. तेव्हा या जुगाराच्या जाहिरातीला महाराष्ट्रातली जनता बळी पडत असून अनेकांचं कौटुंबिक आयुष्य देखील उद्ध्वस्त होत आहे, असं त्यांनी पत्रात म्हटलंय.


मात्र, या पत्राचा कोणताही परिणाम झाला नाही. तेव्हा बच्चू कडूंनी कायदेशीर हत्यार बाहेर काढले आहे. महाराष्ट्रातलीच नाही तर देशातल्या पिढीला जुगाराच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी या जाहिरातीवर बंदीची मागणी बच्चू कडू करत आहेत. आता सचिन या पेचप्रसंगात कशी बॅटिंग करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.