Rohit Pawar On Loksabha Elelction: लोकसभेत बारामतीत नणंद-भावजय यांच्यात सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. अजितदादा पवार त्यांच्या पत्नी सुनेत्री पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असून बारामती मतदारसंघातच सुप्रिया सुळेंविरोधात ही लढत होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार का, असा प्रश्न शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना केला असता त्यांनी थेट स्पष्ट उत्तर दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज पिंपरी-चिंचवड येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी काकी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 


रोहित पवार पुढे म्हणाले की, बारामती लोकसभेत काकी विरुद्ध आत्या अशी लढत झालीच तर आम्ही सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही. कारण त्या आत्तापर्यंत राजकारणात नव्हत्या. त्यांनी केवळ समाजसेवा केली. त्यामुळं बारामतीत खरी लढत ही सुप्रिया ताई विरुद्ध अजित दादा अशी लढत होणार, म्हणून अजित दादांविरोधात बोलू, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. 


अजितदादा कुटुंबात सध्या एकटे


अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी पवार गटाला पाठिंबा दिला आहे. त्यावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युगेंद्र पवार आज बारामतीच्या आमच्या कार्यालयात गेले आहेत. ते कार्यकर्त्यांशी काय बोलले हे पहावं लागेल, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. अजित दादा सध्या कुटुंबात एकटे आहेत, असं चित्र आहे. पण ते सध्या ते स्वतःसाठी आणि मलिदा गॅंग साठी बोलतात,  अशी टीका त्यांनी केली आहे. 


अमोल कोल्हेंना पाडणार


मी पुन्हा येईननंतर आता अमोल कोल्हे यांना पाडणार असं अजित पवार म्हणतात. आता कोल्हे विरोधात पार्थ पवार ही लढत असू शकतो. मात्र अजितदादांना महायुतीत चार जागा मिळतील, पण त्यात शिरूर लोकसभा मिळायची नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 


सुप्रिया सुळे वि सुनेत्रा पवार


दरम्यान, सुप्रिया सुळे या सलग तीन टर्म बारामतीच्या खासदार आहेत. या काळात त्यांनी विविध कामे केली आहेत. या जोरावर त्या संपूर्ण मतदारसंघात दौरा करत असतात. गावोगावी जाऊन त्यांचा संपर्क वाढवत आहेत. इंदापूर, खडकपूर, बारामती, दौंड, पुरंदर या भागातही त्या फिरत असतात. तर, एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती सेक्शन पार्क असेल किंवा इतर माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळं लवकरच त्यांची उमेदवारी जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.