Mumbai Metro Station: मुंबई महानगरातील पहिल्या-वहिल्या डबल डेकर उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं आहे. मीरा भाईंदर येथे हा डबल डेकर पूल उभारण्यात आला आहे. मेट्रो लाइन 9 साठी मेट्रो लाईन-९ साठी डबल-डेकर मेट्रो व्हायाडक्ट आणि उड्डाणपूल यांचा समावेश आहे. या उड्डाणपुलामुळं मीरा-भाईंदर परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार आहे. मुंबई महानगर परिसरातील हा पहिलाच डबलडेकर उड्डाणपूल आहे. या पुलाचा नागरिकांना कसा फायदा होणार हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिला डबल डेकर उड्डाणपूल हा सुमारे 1 किमी लांबीचा असून सध्याच्या रस्त्यापासून 5.5 मीटर उंचीवर आहे. या पुलामुळं मीरा रोड येथील प्लेझंट पार्क, हटकेश आणि सिल्व्हर पार्क जंक्शनवर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून प्रवाशांची सुटका होणार आहेय तसंच, तीन जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी होऊन वाहने एकाच ठिकाणी थांबलेल्या अवस्थेत असण्याचे प्रमाण कमी होईल. त्याचबरोबर नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेची 8 ते 10 मिनिटांची बचत होणार होणार असून इंधनदेखील वाचणार आहे. 


डबल डेकर उड्डाणपूल प्रकल्प हा एमएमआरडीएच्या नव्या दृष्टिकोनाचा एक भाग आहे. मुंबई आणि उपनगरातील जागेची कमतरता पाहता मेट्रो च्या खांबांवर हा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. सध्या दहिसर ते मीरा भाईंदरदरम्यान मेट्रो मार्गिकेच्या उभारणीचे काम सुरू असल्याने परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. तसंच, मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर मेट्रोतून उतरुन प्रवासी या जंक्शनवर दाखल होणार असल्याने वाहतूक कोंडीची शक्यता होती. मात्र, या पुलामुळं नागरिकांचा प्रवास सुखाचा होणार आहे. 


आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर


बांधकामात आय-गर्डर प्री-कास्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यामुळे वेळेची बचत झाली आणि उच्च दर्जा राखता आला. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘टायर स्ट्रॅडल कॅरियर’ तंत्रज्ञानाचा वापर करून दिवसा यू-गर्डर्स उभारण्यात आले. हे तंत्रज्ञान वापरल्याने वाहतूक थांबवावी लागत नाही. हे तंत्रज्ञान महत्त्वाचे होते कारण या मार्गावर दर तासाला सुमारे ८०० वाहने प्रवास करतात. यामुळे हा प्रकल्प २ वर्षांत पूर्ण करण्यात आला. 


एमएमआरडीएने सुमारे ३ किमी लांबीच्या मुख्य डबल-सर्किट डहाणू-वर्सोवा विद्युत वाहिनीचे स्थलांतर केले. मेट्रोच्या कार्यक्षमतेसाठी ही विद्युत वाहिनी ७५ मीटर उंचीवर उभारण्यात आली. आता ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक उंचीवर असलेली वाहिनी झाली आहे.