मराठीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक, पिंपरीत इंग्रजी पाट्यांना फासलं काळं
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने 'मराठी' भाषेच्या वापरासाठी आंदोलन केले. यावेळी महापालिका भवनातील इंग्रजी पाट्यांवर शाई फेकत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
राज्यातील शासकीय कार्यालयात मराठीचा वापर करण्याबाबत अध्यादेश काढण्यात आलाय. मात्र, त्या आदेशाची पायमल्ली पिंपरी चिंचवड महापालिकडून होत असल्याच्या निषेधार्थ मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
सुरूवातीला मनसेच्यावतीने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रविण अष्टीकर यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर पालिका भवनातील चौथ्या मजल्यावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, कॉम्प्युटर सर्व्हर रूमच्या इंग्रजी पाटीला तसेच
संगणक विभाग प्रमुख निळकंठ पोमण यांच्या कार्यालयाबाहेरील इंग्रजीतील फलकावर शाई फेकत काळे फासण्यात आले.