लातूर : लातूर शहरातील रस्त्यात खड्ड्यांचे प्रमाणे वाढले आहे. त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानगरपालिकेला वारंवार निवेदने देण्यात आली होती. मात्र तरीही मनपा प्रशासनाने खड्ड्यांची डागडुजी केली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने महापालिकेपुढे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. अच्छे दिन येतील म्हणून दिल्ली ते गल्ली मतदारांनी भाजपला निवडून दिले. 


लातूर महापालिकेतही भाजपची सत्ता आहे. मात्र तरीही रस्त्यातील साधे खड्डे बुजविणे होत नसल्यामुळे अशा प्रकारचे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.