MNS Amit Thackeray: लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागली आहे. विधानसभेत 220 ते 225 आमदार उभे करण्याचे जाहीर केल्यानंतर मनसे नेते मतदारांची भेट घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यवतमाळच्या वणी येथे दौऱ्यावर असताना त्यांनी खेळाचा आनंद लुटला. वणीच्या स्पोर्ट्स क्लब वर जात अमित ठाकरे स्थानिक खेळाडूंसोबत क्रिकेट व फुटबॉल खेळले, त्यानंतर त्यांच्याशी संवाद देखील साधला.


पाहा व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा तिसरा दिवस 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौ-याचा आजचा तिसरा दिवस आहे.. राज ठाकरे कालच यवतमाळच्या वणीमध्ये दाखल झाले आहेत. आज ते यवतमाळमधील पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी वर्ध्याला जातील. वर्ध्यानंतर ते नागपुरात दाखल होणार आहेत. अमित ठाकरेदेखील यावेळी त्यांच्यासोबत आहेत.


बदलापूर प्रकरणावरुन राज ठाकरे आक्रमक 


बदलापूर शोषण प्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी याप्रकरणावरुन राज्य सरकारला सुनावले आहे. बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले ? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकराला विचारला. एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या, असे आवाहन त्यांनी महाराष्ट्र सैनिकांना केले आहे.