विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना 008 मध्ये चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी कोर्टानं (Parli Court) अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. यासाठी आज राज ठाकरे परळी कोर्टात हजर झाले. कोर्टाने त्यांचा अटक वॉरंट रद्द केला तसंच 500 रुपयांचा दंड ठोठावला. 2008 मध्ये परळीत मनसे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली होती. त्याप्रकरणात राज ठाकरे यांनी कोर्टात हजेरी लावली होती. परळी शहरातील कोर्ट परिसरात राज ठाकरे दाखल झाल्यानंतर कोट परिसरामध्ये मोठी गर्दी झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पळशीतल्या विद्यार्थ्यांना पर्वणी
दरम्यान, राज ठाकरे यांची कोर्ट वारी संभाजीनगर (Sambhaji Nagar) मध्ये विद्यार्थ्यांच्या पथ्यावर पडली. राज ठाकरे यांचं पळशीमध्ये जिथे हेलिकॉप्टर (Helicopter) उतरलं तिथं, रिसॉर्टवर विद्यार्थ्यांची ट्रीप (Student trip) सुरु होती. मग काय राज ठाकरे आणि हेलिकॉप्टर पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आणि त्यांची ट्रीप अविस्मरणीय झाली. 


राज ठाकरे यांना पाहून मुलांचा जल्लोष
राज ठाकरे यांचं हेलिकॉप्टर उतरताच मुलांनी एकाच जल्लोष सुरू केला. आयुष्यात पहिल्यांदाच हेलिकॉप्टर पाहणे आणि त्यातून राज ठाकरे उतरणे हे सगळंच विद्यार्थ्यांसाठी पर्वणी होती. राज ठाकरे यांनी मुलांना पाहिलं आणि गाडीकडे वळलेली पावलं थेट मुलांकडे वळली. जिथं मुलांची धम्माल सुरू होती राज ठाकरे तिथं पोहोचले. राज ठाकरे यांना पाहून मुलांचा आनंद गगनात मावेना. मुलं ओरडायला लागली, घोषणा द्यायला लागले. या मुलांच्या गरड्यातून कसेबसे राज व्हॅनिटी व्हॅनपर्यंत गेले. मात्र लागलीच उतरून मुलांसोबत फोटो काढायला पोहोचले. बऱ्याच दिवसांनी मुलांमध्ये गेलो आनंद वाटला, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.


त्यानंतर राज ठाकरे पून्हा हॅकिंकॉप्टरकडे वळले आणि मुलं कठडे तोडून थेट राज यांच्या कडे धावायला लागली. मुलांची एक दिवसाची सहल राज ठाकरे यांच्या आगमनाने अविस्मरणीय झाली हेच त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं.