Raj Thackeray on Vidhansabha Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश आलंय. यात महाविकास आघाडी पिछाडीवर गेली आहे. दरम्यान या सर्वात वंचित बहुजन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही उमेदवार जिंकवता आला नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभेमध्ये 'एकला चलो रे'ची भूमिका घेण्यात आली. सुरुवातील सर्व जागांवर मनसे उमेदवार उभे करणार आहे, तुम्ही तयारीला लागा असे मनसे अध्यक्षांनी सांगितले होते. यानंतर 138 जागांवर मनसेने उमेदवार दिले होते. पण यातला एकही उमेदवार निवडून आला नाही. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनादेखील पराभवाचा सामना करावा लागला. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचादेखील या निवडणुकीत पराभव झाला.  राज ठाकरेंसाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय.  दरम्यान राज ठाकरेनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 


काय म्हणाले राज ठाकरे?


राज ठाकरे यांनी एका शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. अविश्वसनीय! तुर्तास एवढंच असे राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.


'ठाकरे बंधू एकत्र येणं काळाची गरज!' विधानसभा निकालानंतर राज ठाकरेंच्या एका पोस्टवर...



काय म्हणाले अमित ठाकरे?  


महेश सावंत यांनी माहिमच्या मतदारसंघात विजय मिळवत अमित ठाकरे आणि सदा सरवणकरांचं आव्हान संपुष्टात आणलं. या निवडणुकीत अमित ठाकरे हे या मतदारसंघातील तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले. पण, आपला हा पराभव खचवणारा नसून, खूप काही शिकवणारा आहे, अशीच पहिली प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.


''माहिम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे…
आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो. 
गेली अनेक वर्षे या प्रभागातील अगदीच बेसिक गरजांसाठी लोकांचा संघर्ष बघितला. याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी, प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा, केवळ या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो. मात्र, कदाचित येथील जनतेच्या मनात काही वेगळे असावे. हा कौल मला हेच शिकवतोय की, अजून खूप काम करायचं आहे. अजून मेहनत घ्यायची आहे. अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचं आहे.
माझी ही लढाई कधीच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हती… कारण ही लढाई कोणा राजपुत्राची नसून, ती होती एका सामान्य कार्यकर्त्याची जो सर्वांसाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो. मला फक्त आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणायचं होतं.
आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; एक नवी सुरुवात आहे. तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, माहिम, दादर, प्रभादेवी आणि सबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी, मी २४ तास झटत राहीन, हा माझा शब्द आहे.
ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान केलं, त्यांचे मनापासून आभार. तुमचा विश्वास वाया जाणार नाही.
मी वचन देतो, तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन; कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू!
आपलाच,
अमित ठाकरे'''