मोठी बातमी । हे कायमचे थांबले नाही तर हनुमान चालिसा लावली जाणारच - राज ठाकरे
Raj Thackeray`s press conference in Mumbai : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरुद्ध हनुमान चालीसा पठण आंदोलन पुकारले आहे. हा विषय श्रेय लाटण्याचा नाही. लोकांचा त्रास कमी होणं आहे. मशिदींवर भोंग कायमचे थांबले नाही तर हनुमान चालिसा लावली जाणारच, असा स्पष्ट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा दिला आहे.
मुंबई : Raj Thackeray's press conference in Mumbai : राज ठाकरे यांनी भोंग्याविरुद्ध हनुमान चालीसा पठण आंदोलन पुकारले आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. तर पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्यांची धरपकड करण्यात येत आहे. याबाबत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. 92 टक्के ठिकाणी अजान बंद झाली. तर काही ठिकाणी 5 वाजायच्या आत लागली. काही ठिकाणी कमी आवाजात झाली. पोलीस 5 वाजायच्या आत अजान झाली त्यावर कारवाई करणार का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. लोकांना जो त्रास होत होता, तो कमी होईल. हा विषय श्रेय लाटण्याचा नाही. लोकांचा त्रास कमी होणं आहे. मशिदींवर भोंगे कायमचे थांबले नाही तर हनुमान चालिसा लावली जाणारच, असा स्पष्ट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा दिला आहे.
अनधिकृत भोंगे वाजवणाऱ्या मशिदींवर कारवाई केली पाहिजे. 35 मशिदींवर कारवाई केली पाहिजे. अनधिकृत भोंग्याना परवानगी कशाला दिली गेली आहे. यांनीही रोजच्या रोज परवानगी मागीतली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे झाले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. हा विषय आजचा नाही तर तो कायमचा आहे. हा धार्मिक विषय नाही. धार्मिक वळण दिलं तर आम्हीही तसंच करु, असा स्पष्ट इशारा राज यांनी यावेळी दिला. भोंगा वाजला तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लागणारच. पोलिसांनी भोंग्यावर कारवाई केली पाहिजे. जर हे थांबले नाही तर पुन्हा उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले.
92 टक्के मशिदीतून लाऊडस्पीकरवर अजान नाही
राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, आम्हाला कायदा पाळायला सांगत आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेच पालन केले जात आहे. महाराष्ट्रातील 92 टक्के मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवर अजान झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 50 ते 55 डेसिबलपेक्षा जास्त आवाजात लाऊडस्पीकर वाजवता कामा नये, जेवढा मोठा आवाज आपल्या घरात मिक्सरमधून येतो.
तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवणार
मात्र, यासोबतच राज ठाकरे यांनी दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवण्याच्या मुद्द्याचा पुनरुच्चार करत अनेक ठिकाणी मशिदींमध्ये लाऊडस्पीकरचा वापर केला जात नाही, मात्र ज्यांना अजूनही समजत नाही, त्यांनी तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवा, असे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले.
राज्यभरात सगळीकडे शांतता दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आहे. कुठेही तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये याची खबरदारी राज्य सरकारने आणि पोलिसांनी घेतलेली दिसून येत आहे. दुपारी 1 च्या अजानपूर्वीच मुंबईसह परिसरातील मनसे नेत्यांची धरपकड सुरु आहे. संदीप देशपांडे पोलिसांच्या तावडीतून निसटले. मनसैनिकांसोबत झालेल्या झटापटीत महिला पोलीस जखमी झाल्यात.