माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता येईल तेव्हा...,राज ठाकरेंनी केली मोठी घोषणा
Pune Raj Thackeray Interview: जेव्हा कधी माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता असेल, तेव्हा मी महाराष्ट्राचे प्लानिंग आर्किटेक्चरच्या हातात देईल, अशी घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली.
Pune Raj Thackeray Interview: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात जागतिक आर्किटेक्ट दिनानिमित्त प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी शहर नियोजन, सौंदर्य दृष्टी आणि शाश्वत विकास या विषयावर त्यांनी विविध अंगानी माहिती दिली. पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृह, सातारा रोड येथे ही मुलाखत घेण्यात आली. जेव्हा कधी माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता असेल, तेव्हा मी महाराष्ट्राचे प्लानिंग आर्किटेक्चरच्या हातात देईल, अशी घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली. हा माझा शब्द आहे. उद्या इंजिनिअर्सच्या कार्यक्रमात गेलो तरी आर्किटेक्ट च महाराष्ट्राच प्लॅनिंग करतील हेच सांगेन, असेही ते म्हणाले.
महापालिकेत इंजिनीअरला जेवढे महत्व आहे, तेवढे आर्किटेक्चरला नाही. रस्ते कसे होणार हे आर्किटेक्चर ठरवतात, इंजिनीअर नाही. सर्किट हाऊसला खूप मोठी बाथरुम असतात, अशावेळी काय सारखी आंघोळ करणार? असा मिश्किल टोला ठाकरेंनी आपल्या खास शैलीत लगावला.
आपण एक वेगळा विचार करतो आणि सत्तेत बसलेले वेगळा विचार करतात, त्यामुळे आर्किटेक्चरमध्ये अडचणी दिसतात, असे ते म्हणाले. सरकारकडे पैसे आहेत म्हणून कुठेही वापरले जात आहेत, असेही ते म्हणाले. मी घरातून बाहेर पडल्यावर एका चांगल्या शहरात आहे, असे प्रत्येकाला वाटायला हवे, असे ते म्हणाले.
भाषणातील महत्वाचे मुद्दे
आपल्याकडे कामाची गती विषयी काय बोलावे? रामायणातील सिताहरण ते तिला परत आणण्यासाठी बांधलेल्या सेतू पर्यंतचा कालावधी... मुंबई वरळी सी लिंक तयार व्हायला तेवढाच वेळ लागला...
महाराष्ट्रातल्या प्रत्येक माध्यमवर्गीयाने राजकारण आलेच पाहिजे असे नाही, पण तुमची त्यावर नजर असली पाहिजे. राजकारणाला तुच्छ लेखू नका. तुमच्या सहभागातूनच हा महाराष्ट्र घडेल.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक माध्यमवर्गीयाने राजकारणात आलेच पाहिजे असे नाही, पण तुमची त्यावर नजर असली पाहिजे. राजकारणाला तुच्छ लेखू नका.
तुमच्या सहभागातूनच हा महाराष्ट्र घडेल.
आर्किटेकटनी राकरणात यावं. माझ्याच पक्षात आलं पाहिजे असं नाही. कुठल्याही पक्षात जा. सगळीकडे फिरून थकलात की माझ्याकडे याल...