पुरंदरेंना वृद्धापकाळात शरद पवारांनी त्रास दिला कारण ते... राज ठाकरे यांचे गंभीर आरोप
`महाराष्ट्रात या माणसाने जाती-जातीत विष कालवलं`
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
आज महाराष्टात काय चाललं आहे, आमच्या महाराष्ट्राची आब्रु वेशीवर टांगली जात आहे, रोज नेते वाटेल ते बडबडतायत, येणारी पिढी काय शिकत असेल. हा आपला महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्टाने देशाला दिशा दिली. तो आमचा महाराष्ट्र रोजच्या रोज खड्ड्यात जात आहे, यासाठीच महाराष्ट्र दिन साजरा करायचा आहे का, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
यातून आम्ही काही बोध घेणार आहोत, काय प्रेरणा घेणार आहोत. आज काय महाराष्ट्राची अवस्था करुन ठेवली आहे. आई बहिणीवरुन शिव्या घातल्या जात आहेत टिव्हीवर, तरुणांना काय शिकवलं जात आहे हुल्लडबाजी. सर्व राजकारण्यांना हेच हवं आहे का असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांच्यावर निशाणा
शरद पवार म्हणतात दोन समाजात दुही माजवातायत, हे महाराष्ट्र आणि देशासाठी योग्य नव्हे, मी दुही माजवतोय. पवारसाहेब आपण जातीजातीमध्ये जे भेद निर्माण करतायत ना त्याने दुही माजतेय. प्रत्येक व्यक्ती जातीतून बघायची. हातात पुस्तक घेऊन त्याचा लेखक कोणत्या जातीचा आहे त्याचा विचार करुन बोलायचं. शरद पवारांनी कधीतरी शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आहे का, मी बोलल्यावर आता बोलायला लागले आहेत असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शरद पवार हे नास्तिक आहेत असं मी म्हटल्यावर लगेच झोंबलं लगेच देवाचे फोटो काढले पुजा करताना, नमस्कार करताना. आपली कन्या लोकसभेत बोलली आहे माझे वडिल नास्तिक आहेत. याहून अधिक काय पुरावा देऊ.
शरद पवार म्हणतायत राज ठाकरे यांनी आपल्या आजोबांची पुस्तकं वाचली पाहिजे, पवार साहेब तुम्हाला अपेक्षित असलेली गोष्टी तुम्ही फक्त वाचली आहेत. अख्खी पुस्तकं वाचा संदर्भासहीत मग तुम्हाला कळेल, माझ्या आजोबांनी जे लिहून ठेवलंय ते जर तुम्ही नीट वाचलंत तर ते परिस्थितिला धरून आहे, जातीपातीमध्ये भेद निर्माण करणार नव्हतं. माझे आजोबा भटभिक्षुकीच्या विरोधात होते, हिंदुत्वाच्या विरोधात नव्हते.
या लोकांनी कसं जातीचं विष पाजलं हे आज मी सांगणार आहे. प्रबोधनकारांची पुस्तकं आणि त्यातले संदर्भ खास करुन पवारांना सांगण्यासाठी इथे आणले आहेत. हिंदु मिशनरी स्थापन करणारे माझे आजोबा होते, महाराष्ट्रातला सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरु करणारे माझे आजोबा होते.
आपल्याला पाहिजे तेवढं वाचू नये, हे जे विष या माणसाने कालावलं, राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रात जाती पातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरु झालं अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
मराठा बांधवांची माथी भडकावयची, जेन्म लेन्स सारखा माणूस उभा करायचा, त्याच्या पुस्तकातल्या काहीतरी गोष्टी काढायच्या. ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराज घरात घरात पोहचवले त्या बाबासाहेब पुरंदरेंना वृद्धपकाळात शरद पवारांनी त्रास द्यायला सुरुवात केली. कशासाठी कारण ते ब्राम्हण आहेत म्हणून असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
राज ठाकरेंच्या घरात कधी जातपात शिकवली नाही, आम्हाला जात पात कधी शिकवली नाही. तुमच्या मतांच्या राजकारणासाठी हे सर्व सुरु आहे. हे जर एवढेच आहे तर रायगडावरची समाधी कोणी बांधली. आमच्या लोकमान्य टिळकांनी बांधली. लोकमान्य टिळकांना आता तुम्ही ब्राह्मण म्हणून बघणार आहात का. त्यांनी पहिलं वृत्तपत्र काढलं त्याचं नाव होतं मराठा हे कधी पवार सांगणार नाहीत.
इतकी वर्ष सत्तेत असताना जेम्स लेनला खेचून आणायचा होतं असं सांगत राज ठाकरे यांनी लाव रे व्हिडिओ सांगत जेन्म लेन्सच्या मुलाखतीतील काही भाग वाचून दाखवला.
तुमची केंद्रात सत्ता होती का नाही त्याला खेचून आणलं, असा सवाल राज ठाकरे यांनी शरद पवार यांना विचारला. कशासाठी लोकांना तुम्ही विष पाजत आहात असा आरोपही राज ठाकरे यांनी केला