राज ठाकरेंचा Swag च वेगळा, एकच मारला पण सॉलिड मारला, शिंदे-फडणवीस खळखळून हसले!
शिवाजी पार्क मैदानावर `शिवाजी पार्क दीपोत्सव` कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. त्यावेळी Raj Thackeray यांनी सर्वसामान्यांच्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना एक सॉलिड पंच मारला.
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या खास ठाकरी भाषणासाठी ओळखले जातात. परफेक्ट टायमिंग, योग्यवेळी पंच अन् आवाजाचा चढउतार ही ठाकरेंच्या भाषणाची खास वैशिष्टय... एखादा आडवा आला की मिश्किल शैली वापरून सरळ करण्याची कला राज ठाकरेंना चांगलीच अवगत आहे. नेत्याचा समाचार घेण्यासाठी राज ठाकरे ही जादूची कांडी योग्यवेळी वापरतात. अशातच आज मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात राज ठाकरेंच्या एका विधानामुळे अख्खं शिवाजी पार्क खळखळून हसल्याचं पहायला मिळालं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जाणार आहे. मनसेच्या (MNS) वतीने आज मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर 'शिवाजी पार्क दीपोत्सव' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मनसेच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या देखील होत्या. राज्याच्या राजकारणात नेमकं काय शिजतंय?, असा सवाल आता सर्वांना पडलाय.
तर झालं असं की... दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी आकर्षक रोषणाई मुंबईकरांना पहायला मिळाली. राज ठाकरेंनी स्वत: माईक घेऊन कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. त्यावेळी राज ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना एक सॉलिड पंच मारला.
काय म्हणाले Raj Thackeray -
सध्याचं हे दीपोत्सवाचं 10 वं वर्ष आहे. दरवर्षी आपण असंच दीपोत्सव साजरा करतो. यंदा हे जरा जास्त आहे. अनेकांनी मला विचारलं, हे नातू झाल्यामुळं का? दरवर्षी वाढवत जाऊ आपण... नातू नाही दिवे... असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर मंचावर एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसह शिवाजी पार्क हसलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
पाहा व्हिडीओ-
शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांच्यासह पत्नी शर्मिला ठाकरे देखील हजर होत्या. अमित ठाकरे, मिताली ठाकरे यांच्यासह नातू कियान देखील उपस्थित होता. चिमुकल्या कियानने पहिल्यांदाच आजोबांनी आयोजित केलेल्या मंचावर हजेरी लावली होती. राज ठाकरे यांनी यावेळी आवर्जुन उपस्थिती लावल्याबद्दल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार देखील मानले.