पुणे : MNS leader Vasant More challenges : मला एक बातमी ऐकायला मिळत आहे. सरपंच आणि नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडणून आण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, तुमच्यात हिंमत असेल तर महापौर सुद्धा जनतेतून निवडा. आजच सांगतो, किती पण ताकद लावा,  पुण्याचा महापौर हा मनसेसाच असेल, असे थेट आव्हान मनसे नेते वसंत मोरे यांनी दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला होता. आता महापौरांची निवडही तशीच करुन दाखवा. हिंमत असेल, तर महापौर जनतेतून निवडून आणा, मनसेचाच महापौर होईल, असे मत वसंत मोरे यांनी व्यक्त केले आहे. याबाबत वसंत मोरे यांनी तसे ट्विट केले आहे. राज्यात नवे सरकार आले आणि प्रभाग रचना बदलण्याचे संकेत मिळाले आहेत. त्याचवेळी महापौरही जनतेतून निवडण्याचा निर्णय घेऊन पारदर्शकता दाखवावी, असे आवाहन मोरे यांनी केले आहे.



मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत पुण्यात मनसेचे 29 नगरसेवक निवडून आले होते. मागील निवडणुकीत ही संख्या 2 वर आली होती. आता पुण्यात मनसेची लोकप्रियताच वाढत आहे. थेट महापौर निवडण्यात आला तर मनसेचाच महापौर होईल, असे भाकित वसंत मोरे यांनी केले आहे.