वसई : कल्याण, डोबिवली ठाणे तसेच वसईत ही  मनसे ने फेरीवाल्यांना आपला  दणका दाखवला आहे. वसईत रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना आज मनसेने हुसकावून लावल आहे.  


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या अनधिकृत  फेरीवाले हटविण्यासाठी १५  दिवसांची मुदत मागितली होती. मात्र तरीही  स्टेशन परिसरातील फेरीवाले काही  हटत नव्हते.
आज मनसे नेवसई पूर्वे कडील या फेरीवाल्यांना  दंडुकेशाही दाखवत त्यांचे स्टॉल उधळून लावले आहेत. यावेळी मनसे  पाधाधिकारी आणि फेरीवाले यांच्या मध्ये बाचाबाची देखील झाली होती. 
दरम्यान फेरीवाले काही तसा पुरते हटले असून  काही वेळाने पुन्हा हे फेरीवाले त्या ठिकाणी येवून  बसले होते.  तर वसई विरार महापालिका केवळ  दिखावूपणाची कारवाई करत असून महापालिका प्रशासनाच या फ़ेरीवाल्यांना एक प्रकारे अभय देत असल्याचा आरोप केला जात आहे.