मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या डोळ्यात आज पाणी आलं. कोरोनाचं मुंबई आणि महाराष्ट्रासमोर मोठं संकट आ-वासून उभं आहे. याविषयी राज ठाकरे हे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांचं मुंबई आणि महाराष्ट्रावरील प्रेम आणि काळजी त्यांच्या डोळ्यात दिसली. आज मुंबईची विमानसेवा, रेल्वे, लोकल्स पूर्णपणे बंद केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच आज जे डॉक्टर, पोलीस आणि संबंधित अनेक कर्मचारी सेवा देत आहेत, त्याविषयी मी कोणत्या शब्दात बोलू हे मला माहित नाही, असं सांगत राज ठाकरे यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.


राज ठाकरे यांच्या बोलण्यात मुंबईची काळजी दिसत होती. राज्य सरकार आणि केंद्र सरकार ज्या प्रमाणे काम करीत आहेत, मी त्यांना धन्यवाद देतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील आपलं फोनवरून बोलणं झालं असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.



पोलिसांशी लोकांना हुज्जत घालू नये, काम नसताना घराबाहेर पडू नये, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.