ठाणे : मनसेचं फेरीवाल्यां विरोधातील आंदोलन चांगलंच गाजत आहे. पण आता या आंदोलनाला वेगळंच वळण मिळताना दिसत आहे.


परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांना चोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पुन्हा एकदा मराठी-अमराठीच्या मुद्द्यावरून राडा करताना दिसले आहेत. ठाणे शहरातील परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांना मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिलाय. अनेक ठिकाणी मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात आले. 


फेरीवाला विरोधी आंदोलन


एल्फिन्सटन रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फेरीवाल्यांविरोधात जोरदार आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे चांगलाच वाद पेटला. मात्र मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेरील रस्ते मोकळे झाले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून फेरीवाल्यांना हाकलून लावले. काही कार्यकर्त्यांवर याप्रकरणी गुन्हेही दाखल झाले. 


पण आता या आंदोलनाला पुन्हा प्रांतवादाच्या मुद्द्यावर आणल्याचे दिसत आहे. परंप्रांतातील मच्छी विक्रेत्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांची चांगलाच चोप दिलाय. त्यामुळे आता पुन्हा एकदा यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.