मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागात फिरता दवाखाना - राजेश टोपे
मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक आणि अद्ययावत फिरता दवाखाना (Mobile Clinic) सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई : नॅशनल हेल्थ मिशनच्या (National Health Mission) माध्यमातून लवकरच मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक आणि अद्ययावत फिरता दवाखाना (Mobile Clinic) सुरू करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मुंबईतील जनता दरबारात याबाबत माहिती दिली. आजारी आणि गरोदर महिलांना घरातून हॉस्पिटलमध्ये आणणे, घरी सुरक्षित सोडणे यासाठी ही सुविधा असणार आहे. ( bring sick and pregnant women from home to the hospital and leave them safely at home)
या फिरत्या दवाखान्यात 40 प्रकारच्या तपासण्या, 81 प्रकारची औषधे, सोनोग्राफी यांची सोय असणार आहे. शिवाय महिलांची प्रसुतीही करणे शक्य आहे. ग्रामीण भागात प्रत्येक जिल्ह्यात असे दोन फिरते दवाखाने असणार आहेत. ग्रामीण भागासह मुंबईमध्ये या फिरत्या दवाखान्याची अधिक वाढ केली जाणार आहे. याचा चांगला परिणाम होईल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
मुंबईसह राज्यात महिलांसाठी आता फिरता दवाखाना लवकरत सुरु करण्यात येणार आहे. या नवीन सेवेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येईल, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.