Mobile Disadvantage: मोबाईल हा प्रत्येकासाठी जीवनावश्यक वस्तू झालाय. जीव की प्राण वाटणारा हाच मोबाईल तुमचा जीवही घेऊ शकतो. मोबाईल म्हणजे जीवंत बॉम्ब वाटावा अशी घटना भंडारा जिल्ह्यात घडलीये.खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्यानं एका शिक्षकाचा मृत्यू झालाय. मोबाईलच्या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं मोबाईल वापराबाबत सामान्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा असल्या तरी या यादीत मोबाईलनं कधीच स्थान पटकावलंय. मोबाईल अर्धा तास बंद असला तरी माणूस अस्वस्थ होतो. मोबाईल हा संवादापुरता मर्यादित राहिला नसून तो माणसाची गरज झालाय. पण हाच मोबाईल तुमच्यासाठी जीवघेणा ठरु शकतो. मोबाईल हे फक्त एक गॅझेट राहिलं नसून मोबाईल बॉम्ब झालाय. होय आम्ही सांगतो ते खरं आहे. गोंदियात मोबाईलच्या स्फोटात एका मुख्याध्यापकाचा मृत्यू झालाय.


भंडारा जिल्ह्यातील सिरेगाव टोला गावातील सुरेश संग्रामे बाईकवरुन प्रवास करत होते. सुरेश संग्रामे यांच्या खिशात मोबाईल होता. खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट झाला. मोबाईलच्या स्फोटामुळं सुरेश संग्रामे यांच्या कंबरेजवळचा भाग जळाला. गंभीर जखमा असल्यानं सुरेश संग्रामे यांचा जागीच मृत्यू झाला


मोबाईलच्या स्फोटामुळं सुरेश संग्रामे यांच्या कंबरेजवळील भाग जळाल्याचं स्पष्ट दिसत होतं. शिवाय घटनास्थळीही स्फोट झालेल्या मोबाईलचे तुकडे स्पष्ट दिसत होते. नातेवाईकांनी मोबाईल स्फोटाबाबत एक वेगळीच थिअरी मांडलीये. मोबाईलचा स्फोट होण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही मोबाईल स्फोटाच्या घटना घडल्यात. पण मोबाईलनं कुणाचा जीव जाणं ही पहिलीच घटना असल्याचं सांगण्यात येतयं. 


मोबाईल स्फोटाची कारणं काय?


चार्जिंग करताना मोबाईलचा वापर केल्यानं स्फोट होऊ शकतो
सूर्यप्रकाशात फोन दीर्घकाळ ठेवल्यास स्फोटाची शक्यता वाढते
मोबाईलच्या बॅटरीपेक्षा जास्त वॅट्सचा चार्जर वापरल्यास स्फोट होऊ शकतो
मोबाईलच्या बॅक कव्हरमध्ये पैसे किंवा कागद ठेवल्यानं स्फोटाची शक्यता वाढते
स्मार्टफोनच्या बॅटरीचं ओव्हरचार्जिंगमुळे स्फोट होऊ शकतो
नॉनसर्टिफाईट किंवा बनावट चार्जर वापरल्यानं फोनचा स्फोटाची शक्यता वाढू शकते
जुनी किंवा फुगलेल्या मोबाईल बॅटरीमुळं स्फोट होऊ शकतो
विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यावरच मोबाईलचा स्फोट होण्याची शक्यता आहे.



मोबाईल तयार करताना बॅटरी सुरक्षित राहिल याची पुरेपूर काळजी घेतली असते त्यामुळं सामान्य वापरात मोबाईल सुरक्षित असल्याचं तज्ज्ञ सांगतात. मोबाईल सुरक्षित असला तरी वापरताना सावधान. नाहीतर तुमचा मोबाईल बॉंम्ब होऊ शकतो आणि तोच मोबाईल तुमचा काळ होऊ शकतो.