मुंबई : मोडक सागर धरणातून मुंबईला दररोज ४५५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. हे धरण ओव्हर फ्लो झाल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैतरणा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोडकसागर धरण ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात वैतरणा नदीवर आहे.  गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणांतील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. हे धरण ओव्हर फ्लो झाले आहे.  आधी तानसा आणि आज मोडक सागर धरणही वाहू लागले. मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर धरणही भरून वाहू लागले आहे. हे धरण आज सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी वाहू लागले.


मुंबईला मोडका सागर धरणातूनही पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे मुंबईवरील पाणी संकट आता आणखी कमी झाले आहे. त्याआधी तानसा भरले होते.  अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा,  भातसा, विहार आणि तुलसी या धरणांमधून मुंबई शहराला पाणीपुरवठा होतो.