नागपूर मेट्रोचे मोदींच्या हस्ते लोकार्पण
मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे आज व्हिडिओ कॉन्फरिन्सिंगद्वारे लोकार्पण करण्यात आले.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे आज व्हिडिओ कॉन्फरिन्सिंगद्वारे लोकार्पण करण्यात आले. वर्धा मार्गावरील एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मोदींनी नेहमीप्रमाणे आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. या उदघाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. शुक्रवारी ८ मार्चला महामेट्रो आभार दिन म्हणून साजरा करणार आहे. या दिवशी नागपूरकरांना मेट्रोचा नि:शुल्क प्रवास घडणार आहे.
शुक्रवारपासून मेट्रो खापरी ते सीताबर्डी या १३ कि़मी. मार्गावर धावणार आहे. शनिवारी ९ मार्चपासून सीताबर्डी ते खापरी या मार्गावर मेट्रोचा व्यावसायिक प्रवास एक महिना सवलतीच्या दरात सुरू होईल. खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअऱपोर्ट हे मेट्रो स्टेशन पूर्णपणे सज्ज झाली आहे.
बहुप्रतिक्षित नागपूर मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यावरील वाहतूक आजपासून सुरू झाली आहे. दिल्लीहून पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हीडीओ लिंकच्या माध्यमातून मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. उद्घाटनानंतर एअरपोर्ट साऊथ ते खापरी या मार्गावरून मेट्रो धावली. यासाठी या मार्गावरील सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली आहेत.